जया मानला देव तो पुजिताहे ।
परी देव शोधुनि कोणी न पाहे ॥
जगी पाहता देव कोट्यानुकोटी ।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥ १७८॥
ज्याला देव मानला त्याला पुजतो, पण देव शोधून कोणी पाहत नाही. जगात देव कोट्यवधी आहेत. ज्याला भक्ती मानली तीच मोठी.
- समर्थ रामदास