तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।
तया देवरायासि कोणी न बोले ॥
जगीं थोरला देव तो चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९॥
तीन लोक ज्याच्यापासून निर्माण झाले, त्या देवरायाशी कोणी बोलत नाही. थोरला देव चोरलेला आहे. गुरुवाचून तो मुळीच दिसत नाही.
- समर्थ रामदास