मनाचे श्लोक

मना राघवेंवीण आशा नको रे

मनाचे श्लोक १८.

मना राघवेंवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें ।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥

रामावाचून आशा नको, आणि माणसांची कीर्ती नको. वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्याचे वर्णन करतात, त्याचे वर्णन केले की सारे श्लाघ्य होतात.

- समर्थ रामदास