गुरु पाहता पाहता लक्ष कोटी ।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ॥
मनी कामना चेटके धातमाता ।
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ १८०॥
गुरु पाहता पाहता लक्ष कोटी दिसतात. मंत्रावलीची शक्ती मोठी आहे. मनात कामना, चेटूक आणि धातमाता आहे. तो व्यर्थ आहे. मुक्ती देणारा तो नव्हे.
- समर्थ रामदास