मनाचे श्लोक

नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु

मनाचे श्लोक १८१.

नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु ।
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ॥
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।
जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू ॥ १८१॥

चेटूक करणारा, द्रव्याचा भोंदू, निंदक, मत्सरी, भक्तीत मंद, उन्मत्त, व्यसनी आणि संगबाधू तो नव्हे. ज्ञानी तोच साधू, आणि तो अगाध आहे.

- समर्थ रामदास