मनाचे श्लोक

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी

मनाचे श्लोक १८३.

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी ॥
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥ १८३॥

भक्त, ज्ञानी, विवेकी, विरागी, कृपाळू, मनस्वी, क्षमावंत आणि योगी. प्रभू दक्ष, व्युत्पन्न आणि चातुर्य जाणणारा. त्याच्या योगाने समाधान बाणते.

- समर्थ रामदास