मनाचे श्लोक

नव्हे तोचि जाले नसे तेचि आले

मनाचे श्लोक १८४.

नव्हे तोचि जाले नसे तेचि आले ।
कळो लागले सज्जनाचेनि बोले ॥
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे ।
मना संत आनंत शोधीत जावे ॥ १८४॥

तो झालो नाही, आणि नसलेला आला नाही. सज्जनांच्या बोलाने कळू लागले. अनिर्वाच्य ते वाच्य वाचेने वदावे. मना, संत अनंत शोधत जा.

- समर्थ रामदास