मनाचे श्लोक

लपावे अति आदरे रामरुपी

मनाचे श्लोक १८५.

लपावे अति आदरे रामरुपी ।
भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी ॥
कदा तो जनी पाहतांही दिसेना ।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥ १८५॥

रामरूपात आदराने लपावे. स्वस्वरूपात भयातीत आणि निश्चित यावे. जगात पाहता कधी दिसत नाही. ऐक्य भिन्नभावाने वसत नाही.

- समर्थ रामदास