देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे ।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे ॥
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे ।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥ १८८॥
देहभान ज्ञानशस्त्राने खुडावे. विदेहीपणाने भक्तीमार्गे जावे. विरक्तीच्या बळावर निंद्य सारे त्यागावे. संग सोडून सुखी राहावे.
- समर्थ रामदास