मनाचे श्लोक

मही निर्मिली देव तो ओळखावा

मनाचे श्लोक १८९.

मही निर्मिली देव तो ओळखावा ।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा ॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे ।
परी संग सोडुनि सुखे रहावे ॥ १८९॥

पृथ्वी निर्माण करणारा देव ओळखावा. त्याला पाहता जीवाला तत्काळ मोक्ष आहे. त्या निर्गुणाला गुणाने पाहावे. संग सोडून सुखाने राहावे.

- समर्थ रामदास