मनाचे श्लोक

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना

मनाचे श्लोक १९१.

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ॥
परब्रह्म तें मीपणे आकळेना ।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥ १९१॥

ज्याचा देहबुद्धीचा निश्चय ढळत नाही, त्याला ज्ञान कल्पांताच्या काळीही कळत नाही. परब्रह्म मीपणाने आकळत नाही. मनात शून्य अज्ञान मावळत नाही.

- समर्थ रामदास