मनाचे श्लोक

मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे

मनाचे श्लोक १९२.

मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे ।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे ॥
तया खुण ते हीन दृष्टांत पाहे ।
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥ १९२॥

ज्याचे रूप मनाला कळत नाही आणि ढळत नाही, दुज्यावाचून ते सर्वोत्तमाचे ध्यान आहे. त्याची खूण हीन दृष्टांताने पाहता येत नाही. तिथे संग आणि निःसंग दोन्ही साजत नाहीत.

- समर्थ रामदास