नव्हे जाणता नेणता देवराणा ।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ॥
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ १९३॥
देवराणा जाणता नाही, नेणता नाही. वेद, शास्त्र आणि पुराण त्याचे वर्णन करू शकत नाहीत. तो दृश्य नाही, अदृश्य नाही. श्रुती त्याचा अंत जाणत नाही.
- समर्थ रामदास