वसे हृदयी देव तो कोण कैसा ।
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा ॥
देहे टाकिता देव कोठे पहातो ।
परि मागुता ठाव कोठे रहातो ॥ १९४॥
हृदयात देव कोण आणि कसा वसतो, असा प्रश्न साधक आदराने पुसतो. देह टाकता देव कोठे पाहतो, आणि पुन्हा कोठे राहतो.
- समर्थ रामदास