मनाचे श्लोक

बसे हृदयी देव तो जाण ऐसा

मनाचे श्लोक १९५.

बसे हृदयी देव तो जाण ऐसा ।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ॥
सदा संचला येत ना जात कांही ।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ १९५॥

हृदयात देव असा जाण. आकाशाप्रमाणे व्यापक जाण. नेहमी संचलेला, येत नाही आणि जात नाही. त्याच्यावाचून रिता ठाव कोठे नाही.

- समर्थ रामदास