मनाचे श्लोक

नभी वावरे जा अणुरेणु काही

मनाचे श्लोक १९६.

नभी वावरे जा अणुरेणु काही ।
रिता ठाव या राघवेवीण नाही ॥
तया पाहता पाहता तोचि जाले ।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥ १९६॥

आकाशात अणुरेणू वावरतो, पण रामावाचून रिता ठाव नाही. पाहता पाहता तोच झाले. तिथे लक्ष आणि आलक्ष सारे बुडाले.

- समर्थ रामदास