नभासारिखे रुप या राघवाचे ।
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे ॥
तया पाहता देहबुद्धी उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥ १९७॥
रामाचे रूप आकाशासारखे आहे. मनात चिंतिले की भवाचे मूळ तुटते. पाहता देहबुद्धी उरत नाही. आर्त पोटात कधी पुरत नाही.
- समर्थ रामदास