मनाचे श्लोक

नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे

मनाचे श्लोक १९८.

नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।
रघूनायका ऊपमा ते न साहे ॥
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥ १९८॥

आकाशाने सारी सृष्टी व्यापली आहे, तरी रघुनायकाची उपमा त्याला साजत नाही. दुज्यावाचून जो तोच तो, हा स्वभाव आहे. त्याला व्यापक म्हणणे व्यर्थ आहे.

- समर्थ रामदास