अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे ।
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे ॥
अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे ।
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे ॥ १९९॥
रूप अति जीर्ण आणि विस्तीर्ण आहे. तिथे तर्काचा संपर्क साजत नाही. अति गूढ दृश्य तत्काळ सोपे होते. स्वामीच्या प्रतापाची खूण दुज्यावाचून आहे.
- समर्थ रामदास