मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २॥
मनाला भक्तीच्या वाटेनेच जायला सांगितले आहे. तसे गेले की श्रीहरी आपोआप लाभतो. जगात निंद्य ते सारे सोडावे, आणि वंद्य ते भावाने करावे.
- समर्थ रामदास