मनाचे श्लोक

कळे आकळे रुप ते ज्ञान होता

मनाचे श्लोक २००.

कळे आकळे रुप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे ।
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥ २००॥

ज्ञान झाले की रूप कळते आणि आकळते. तिथे सर्वसाक्षी अवस्था आटते. मना, उन्मनीत शब्द कुंठित राहतो. तोच तो राम सर्वत्र पहा.

- समर्थ रामदास