कदा ओळखीमाजि दूजे दिसेना ।
मनी मानसी द्वैत काही वसेना ॥
बहूता दिसा आपली भेट जाली ।
विदेहीपणे सर्व काया निवाली ॥ २०१॥
ओळखीत कधी दुजे दिसत नाही. मनाने आणि मानसाने द्वैत वसत नाही. खूप दिवसांनी आपली भेट झाली. विदेहीपणाने सारी काया निवाली.
- समर्थ रामदास