मनाचे श्लोक

मना गुज रे तूज हे प्राप्त झाले

मनाचे श्लोक २०२.

मना गुज रे तूज हे प्राप्त झाले ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥ २०२॥

मना, हे गुज तुला प्राप्त झाले आहे, पण आत यत्न पाहिजे. श्रवणाने निश्चय पावला जातो. सज्जनसंगती धरली की धन्य होशील.

- समर्थ रामदास