मना सर्वही संग सोडूनि द्यावा ।
अती आदरे सज्जनाचा धरावा ॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे ।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥ २०३॥
सारा संग सोडून द्यावा, आणि आदराने सज्जनाचा संग धरावा. ज्याच्या संगाने महादुःख भंगते, आणि साधनेवाचून सन्मार्ग लागतो.
- समर्थ रामदास