मनाचे श्लोक

मना संग हा सर्वसंगास तोडी

मनाचे श्लोक २०४.

मना संग हा सर्वसंगास तोडी ।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ॥
मना संग हा साधना शीघ्र सोडी ।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥ २०४॥

हा संग सर्व संग तोडतो, मोक्ष तात्काळ जोडतो, साधना लवकर सोडतो, आणि द्वैत निःशेष मोडतो.

- समर्थ रामदास