मनाचे श्लोक

मनाची शते ऐकता दोष जाती

मनाचे श्लोक २०५.

मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ॥ २०५॥

मनाचे हे शतक ऐकता दोष जातात. मंद मती साधनेला योग्य होते. अंगात ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य चढते. दास म्हणतो, विश्वास धरला की मुक्ती भोगता येते.

- समर्थ रामदास