मना वासना चूकवीं येरझारा ।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवीं राघवासीं ॥ २१॥
येरझाराच्या वासना चुकवाव्या. द्रव्य आणि दार यांच्या कामना सोडाव्या. गर्भवासी यातना थोर आहेत. सज्जन मना, रामाची भेट कर.
- समर्थ रामदास