मनाचे श्लोक

न बोलें मना राघवेवीण कांहीं

मनाचे श्लोक २३.

न बोलें मना राघवेवीण कांहीं ।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं ॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो? ॥ २३॥

रामावाचून काही बोलू नये. वाया बोलण्यात सुख नाही. घडीघडी काळ आयुष्य नेतो. देहाच्या शेवटी तुला कोण सोडणार.

- समर्थ रामदास