रघुनायकावीण वांया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४॥
रघुनायकावाचून शिणणे वाया जाते. जनांसारखे व्यर्थ का वोसणावे. नाम वाचेत नेहमी वसो. पापिणी अहंता मनात नसो.
- समर्थ रामदास