मना वीट मानूं नको बोलण्याचा ।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा ॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे ।
पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥ २५॥
बोलण्याचा वीट मानू नये. पुढे राम पुन्हा जोडेल कोठे. सुखाची घडी लोटली की सुख आहे. पुढे काही राहत नाही.
- समर्थ रामदास