मनाचे श्लोक

भवाच्या भये काय भीतोस लंडी

मनाचे श्लोक २७.

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७॥

भवाच्या भयाने का भीतोस. धीर धर, आणि धाक सोड. रघुनायक डोक्यावर स्वामी आहे. कोपलेला दंडधारी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास