दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८॥
राम दिनानाथ आहे, धनुष्यधारी आहे. त्याला पाहता काळ पोटात थरथरते. हे वाक्य खरे मानावे. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास