मनाचे श्लोक

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे

मनाचे श्लोक २९.

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥ २९॥

रामाच्या पायात भक्तांचे ब्रीद नेहमी गाजते, आणि भक्तांच्या शत्रूच्या डोक्यावर कांब वाजते. त्याने विमानाने पुरी वाहिली. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास