मनाचे श्लोक

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

मनाचे श्लोक ३.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३॥

पहाटे मनात राम असावा, आणि बोलण्याआधी त्याचे नाव यावे. सदाचार सोडू नये. तोच माणूस जगात धन्य होतो.

- समर्थ रामदास