मनाचे श्लोक

समर्थाचिया सेचका वक्र पाहे

मनाचे श्लोक ३०.

समर्थाचिया सेचका वक्र पाहे ।
असा सर्व भुमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३०॥

समर्थाच्या सेवकाकडे वक्र पाहणारा भूमांडळी कोण आहे. ज्याची लीला तीन लोक वर्णन करतात, तो राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास