महासंकटी सोडिले देव जेणें ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१॥
त्याने महासंकटातून सोडवले. प्रतापाने आणि बळाने तो सर्वगुणांनी आगळा आहे. पार्वती आणि शंकर त्याचे स्मरण करतात. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास