मनाचे श्लोक

अहल्या शिळा राघवें मुक्त केली

मनाचे श्लोक ३२.

अहल्या शिळा राघवें मुक्त केली ।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२॥

रामाच्या पाया लागता अहल्येची शिला दिव्य होऊन गेली. वेदवाणी त्याचे वर्णन करता थकते. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास