वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनी दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३॥
मेरू, मांदार, चंद्र, सूर्य, तारे आणि मेघमाला या सृष्टिलीलेत वसतात. त्याने जगात दोन्ही दास चिरंजीव केले. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास