मनाचे श्लोक

उपेक्षी कदा रामरुपी असेना

मनाचे श्लोक ३४.

उपेक्षी कदा रामरुपी असेना ।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४॥

रामरूपी कधी उपेक्षत नाही, तरी जीवांमनांत तो निश्चय वसत नाही. पुराणे म्हणतात, शिरी भार वाहेन. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास