मनाचे श्लोक

असे हो जया अंतरी भाव जैसा

मनाचे श्लोक ३५.

असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५॥

आत भाव जसा, तसा देव वसतो. अनन्याला चापपाणी रक्षितो. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास