सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६॥
देव नेहमी जवळ आहे, आणि कृपाळूपणाने थोडे धैर्य पाहतो. तो सुख, आनंद आणि कैवल्य देतो. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास