सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७॥
चक्रवाकाला सूर्य जसा, तसा स्वामी संकटात उडी घालतो. हरीभक्तीचा घाव निशाणी गाजवतो. राम दासाभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास