मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८॥
मनाची एक प्रार्थना आहे, रघुराज थक्क होऊन पाहील इतकी. अवज्ञा कधी करू नये. सज्जन मना, रामाच्या ठायी वास कर.
- समर्थ रामदास