जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगें समाधान बाणे ॥
तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९॥
वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्याचे वर्णन करतात, आणि ज्याच्या योगाने समाधान बाणते, त्याच्यासाठी हे सारे चांचल्य द्यावे. सज्जन मना, रामाच्या ठायी वास कर.
- समर्थ रामदास