मनाचे श्लोक

मना पाविजे सर्वही सूख जेथे

मनाचे श्लोक ४०.

मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें ॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४०॥

जिथे सर्व सुख पावते, तिथे आदराने लक्ष ठेवावे. विवेकाने देहाची कल्पना पालटावी. सज्जन मना, रामाच्या ठायी वास कर.

- समर्थ रामदास