बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं ।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं ॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ४१॥
खूप हिंडले तरी सौख्य होणार नाही. शिणाल, तरी हित तुटत नाही. विचाराने आत बोध करावा. सज्जन मना, रामाच्या ठायी वास कर.
- समर्थ रामदास