मनाचे श्लोक

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी

मनाचे श्लोक ४४.

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥
नसें राम ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे ॥ ४४॥

जगात मौनमुद्रा धरावी, आणि आदराने रामाची कथा करावी. राम नसेल ते धाम सोडावे. सुखासाठी अरण्य सेवत जावे.

- समर्थ रामदास