जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीनें मती राम सोडी ॥ ४५॥
ज्या संगतीने समाधान भंगते आणि अहंता अकस्मात लागते, त्या संगतीत गोडी काय. ज्या संगतीने मती राम सोडते, ती सोडावी.
- समर्थ रामदास