मनाचे श्लोक

मना जे घडी राघवेवीण गेली

मनाचे श्लोक ४६.

मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवां हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६॥

रामावाचून गेलेली घडी ही आपली हानी आहे. रघुनायकावाचून तो शीण आहे. दक्ष माणूस लक्ष लावून पाहतो.

- समर्थ रामदास