मनाचे श्लोक

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे

मनाचे श्लोक ४७.

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे ॥
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७॥

मनाने आणि डोळ्यांनी श्रीहरीच पाहावा. जाणता मुक्त होऊन राहतो. गुणात प्रीती राखून साधनेचा क्रम पाळतो. जगात सर्वोत्तमाचा दास धन्य आहे.

- समर्थ रामदास